Yashwant Kshirsagar
शेवगा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शेवग्याच्या भाजीचे किंवा सूपचे सेवन नियमित केल्यास तसेच अनेक आजारांत आराम मिळतो.
शेवग्याच्या भाजीत जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक घटक असतात. या भाजीला औषध तसेच वैद्यक शास्त्रात खूप महत्व आहे.
शेवगा पुरुषांसाठीही खूप फायदेशीर आहे. अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार, शेवगा पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगला आहे.
आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या फुलांना खूप महत्त्व आहे. कारण ते पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या आणि प्रजनन क्षमता सुधारते.
अनेक तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिलांसाठी शेवग्याची पाने खूप फायदेशीर असतात.
उन्हाळ्यात पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या असेल तर या शेगांचे सेवन केल्याने आराम मिळतो.
सूचना: ही माहिती इंटरनेटवरील स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे, esakal.com याची पुष्टी करत नाही, कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.