हम दो हमारे तीन! 'या' देशांत 3 मुले जन्माला घालण्याचा सरकारचा आदेश

Mansi Khambe

घटती लोकसंख्या

अनेक देशांमध्ये घटती लोकसंख्या मोठी समस्या बनली आहे. घटता जन्मदर युद्धापेक्षाही मोठा धोका मानला जात आहे.

Low Population | ESakal

जन्मदर वाढण्यासाठी आकर्षक ऑफर

परिणामी वृद्धांची संख्या वाढत असून काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी अनेक देश लोकांना मुले होण्यासाठी आकर्षक ऑफर देत आहेत.

Population increases scheme | ESakal

मूल होण्यासाठी विशेष रजा

लोकसंख्या वाढण्यासाठी अनेक देश जोडप्यांना मूल होण्यासाठी विशेष रजा देत आहेत. तसेच त्यांना आर्थिक मदत देखील करत आहेत.

Population | ESakal

तीन मुलांचा आदेश

तुर्कस्तानमध्ये महिलांना कमी मुले होणे चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे तुर्की सरकारने येथे महिलांना किमान तीन मुले जन्माला घालण्याचा आदेश दिला आहे.

Turkey population | ESakal

रशियामध्ये ४ बाल नियम

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे लोकसंख्या दर झपाट्याने कमी झाला आहे. यामुळे प्रत्येक जोडप्याला प्रत्येकी ४ मुले जन्माला घालण्याचे आवाहन करण्यात आले.

Russia population | ESakal

रशिया सरकारची आर्थिक मदत

रशिया सरकार प्रत्येक मुलासाठी १० लाख रूबल म्हणजेच सुमारे ८ लाख रुपये देईल असेही सांगण्यात आले.

Russia population | ESakal

चीनमध्ये लोकसंख्येची कमतरता

चीन एकेकाळी सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होता. मात्र जन्मदरावर नियंत्रण लादल्यामुळे आता तिथे लोकसंख्येची कमतरता समस्या बनली आहे.

China Popullation | ESakal

चीनमध्ये तीन मुलांचे धोरण

चीनमध्ये सरकारने तीन अपत्यांचे धोरण मंजूर केले आहे. तिसऱ्या मुलासाठीहोणाऱ्या खर्चावर अनुदान आणि कर सवलत दिली जाईल, असेही सांगण्यात आले.

China Population | ESakal

व्हिएतनाममध्ये २ पेक्षा अधिक मुले

व्हिएतनाममध्ये जोडप्यांना फक्त दोन मुले असण्याचा नियम होता. पण यावर्षी व्हिएतनाममध्येही लोकांना दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

vietnam population | ESakal

जपानमध्ये विविध ऑफर

जपानमध्येही जन्मदर कमी होत आहे. तो वाढवण्यासाठी सरकार लोकांना विविध प्रकारच्या ऑफर देत आहे.

Japan Population | ESakal

फ्रिजमध्ये लगेच खराब होणारी फळे कोल्ड स्टोरेजमध्ये महिनाभर ताजी कशी राहतात?

Fridge fruits | ESakal
येथे क्लिक करा