इंग्लंडकडून खेळलेला भारतीय राजपुत्र: दुलीपसिंह

Pranali Kodre

क्रिकेट आणि राजघराणे

क्रिकेट आणि राजघराण्याचा संबंध फार जुना आहे, भारतात पूर्वी क्रिकेट प्रामुख्याने राजघराण्यांमध्येच खेळलं जायचं. असाच एक राजपुत्र, ज्याच्या नावाने आज बीसीसीआय 'दुलीप ट्रॉफी' ही प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित करते.

DuleepSinghji

|

Sakal

दुलीप सिंह कोण?

पण ही स्पर्धा ज्यांच्या नावाने खेळवली जाते, ते दुलीप सिंह नेमके होते कोण? तर १३ जून १९०५ रोजी सौराष्ट्रातील नवानगर राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. महान क्रिकेटपटू रणजितसिंहजी हे त्यांचे काका होते.

DuleepSinghji

|

Sakal

इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरुवात

१९२० च्या दशकात ते इंग्लंडला शिकायला गेले आणि तिथे इंग्लंडच्या चेल्टनहॅम कॉलेज आणि कॅम्ब्रिज विद्यापीठातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली.

DuleepSinghji

|

Sakal

इंग्लंडसाठी पदार्पण

त्यावेळी भारतीय कसोटी संघ नसल्यामुळे १९२९ मध्ये त्यांनी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं.

DuleepSinghji

|

Sakal

ॲशेस मालिकेत शतक

१२ कसोटी सामने खेळणाऱ्या दुलीपसिंह यांनी १९३० च्या ॲशेस मालिकेत डॉन ब्रॅडमन यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्ड्सवर १७३ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.

DuleepSinghji

|

Sakal

३३३ धावा साडेपाच तासात...

याच वर्षी ससेक्सकडून खेळताना त्यांनी नॉर्थॅम्प्टनशायरविरुद्ध अवघ्या साडेपाच तासांत ३३३ धावा कुटलेल्या. त्यांना क्रिकेट जगतात प्रेमाने 'मिस्टर स्मिथ' म्हणूनही ओळखलं जायचं.

DuleepSinghji

|

Sakal

२७ व्या वर्षी निवृत्ती

ते केवळ एक क्लासिक फलंदाजच नव्हते, तर अप्रतिम स्लिप फील्डर आणि लेग-ब्रेक गोलंदाजीही करायचे. दुर्दैवाने, गंभीर आजारपणामुळे अवघ्या २७ व्या वर्षी त्यांना क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.

DuleepSinghji

|

Sakal

५० शतकं अन् १५ हजार धावा...

परंतु, अवघ्या ८ मोसमांत त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० शतकांसह १५ हजारांहून अधिक धावा केल्या होत्या. क्रिकेटनंतर त्यांनी भारताचे उच्चायुक्त आणि प्रशासक म्हणूनही देशसेवा केली.

DuleepSinghji

|

Sakal

दुलीप ट्रॉफी

पण १९५९ मध्ये अवघ्या वयाच्या ५४ व्या वर्षी हर्ट ऍटॅकने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बीसीसीआयने १९६१-६२ मध्ये दुलीप ट्रॉफीची सुरुवात केली, ज्यात भारताच्या विविध भागांचे म्हणजे विभागीय संघ खेळतात.

DuleepSinghji

|

Sakal

भारतासाठी ३३ व्या वर्षी पदार्पण! सारांश जैनचा विक्रम

Saransh Jain

|

Sakal

येथे क्लिक करा