Pranali Kodre
एकिकडे युवा खेळाडूंना संधी मिळालायला हवी असे सूर उमटत असतानाच त्यानं वयाच्या ३३ व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केलं आणि मेहनत कधीच वाया जात नाही हे दाखवून दिलं.
Saransh Jain
Sakal
तो खेळाडू आहे, सारांश जैन. त्याला श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीतून पदार्पणाची संधी मिळाली आणि इतिहास घडला.
Saransh Jain
Sakal
तो २१ व्या शतकात भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलाय.
Saransh Jain
Sakal
इतकंच नाही, तर आयपीएल सुरू झाल्यापासून आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वीच भारतासाठी पदार्पण करणारा तो मुरली विजय अन् मोहम्मद शमी नंतरचा तिसराच खेळाडू आहे.
Saransh Jain
Sakal
प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी आयपीएलमध्ये नेट बॉलर होणं नाकारणाऱ्या सारांशने गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेट अक्षरश: गाजवलंय आणि त्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं.
Saransh Jain
Sakal
त्याने जुलैमध्ये श्रीलंका अ संघाविरूद्धही ७० धावांची खेळी केलेली, तर ६ विकेट्स घेतल्या. त्याने २०२४-२५ वर्षात ३०० हून अधिक धावा आणि ४० हून अधिक विकेट्स घेतल्या होत्या.
Saransh Jain
Sakal
२०२५-२६ हंगामातही तो इराणी कप, दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी अशा स्पर्धांमध्ये चमकला अन् अखेर त्याला भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर बोलवणं आलं.
Saransh Jain
Sakal
आता तो आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणूनही ओळखला जाणार आहे.
Saransh Jain
Sakal
Manav Suthar
Sakal