सकाळ वृत्तसेवा
१९६५ मध्ये युद्धाच्या काळात पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सरसंघचालक गोळवलकर यांना दिल्लीत शांतता राखण्यासाठी मदत मागितली होती.
पंजाब सीमेवरून भारतीय लष्कर सियालकोटकडे सरसावलं होतं.
वजिराली भागातून १३५ रणगाड्यांसह पाकिस्तानी दल फिल्लोरकडे येत होतं. एअरफोर्सही हल्ले करत होती.
बाह्य युद्धात पोलिस दल व्यस्त असताना अंतर्गत अस्थिरतेचा धोका वाढला होता. ही बाब शास्त्रींनी गंभीरतेने घेतली.
पंतप्रधान शास्त्रींनी सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना दिल्लीत बोलावलं आणि स्वयंसेवकांची मदत मागितली.
संघ स्वयंसेवकांनी राजधानीतील वाहतूक आणि सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली. पोलीस दलाला मोठा दिलासा मिळाला.
दिल्लीपुरत मर्यादा न राहता स्वयंसेवक सीमेवरही गेले आणि जवानांना जेवण वाटप केलं.
शास्त्रींनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रीय हितासाठी संघाचा सल्ला घेतला, हे लालकृष्ण अडवाणींनीही नोंदवलं आहे.
भारतीय लष्कराच्या जोरदार हल्ल्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. संयुक्त राष्ट्राला हस्तक्षेप करावा लागला.
२३ सप्टेंबर रोजी युद्धविराम घोषित झाला. भारताचं सैन्य आणि जनता यांच्या एकतेमुळे युद्ध भारतानं जिंकलं.
ही माहिती डॉ. हरिश्चंद्र बर्थवाल यांनी The Rashtriya Swayamsevak Sangh: An Introduction या पुस्तकात दिली आहे.