सकाळ वृत्तसेवा
कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर देशाला संबोधित केलं. त्यानंतर त्यांची देशभरात चर्चा झाली.
कर्नल सोफिया आणि डॉ. शायना सन्सारा या जुळ्या बहिणी आहेत.
वडील 1971 च्या युद्धात लढले होते, आजोबा स्वातंत्र्यलढ्यातही सहभागी होते. त्यामुळे घरातच त्यांना देशभक्तीचा वारसा लाभला.
डॉ. शायना ही अर्थशास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, फॅशन डिझायनर, माजी आर्मी कॅडेट, रायफल शुटिंगमध्ये राष्ट्रपतींचा सुवर्णपदक विजेती आहे.
शायनाला Ms. Gujarat, Ms. India Earth 2017, Ms. United Nations 2018, 2018 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
गुजरातमध्ये 1 लाख झाडं लावण्याचा उपक्रम राबवला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव गौरव झाला.
ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सोफियाला पाहून शायनाच्या डोळ्यांत पाणी आलं. 'माझी राणी लक्ष्मीबाई आहे ती', असं तिनं म्हटलं.
36 तासांत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. ड्रोन हल्ल्यांना उत्तर, सीमा भागात ब्लॅकआऊट, शाळा बंद केल्या आहेत, तसेच IPL थांबवण्यात आलं.
एकीने युनिफॉर्म घालून देशाचं नेतृत्व केलं, दुसरीने विविध क्षेत्रांत भारताचं नाव उज्वल केलं.