एक षटकार अन् 6 घरात सोलर पॅनल, राजस्थान रॉयल्सचा अनोखा उपक्रम

प्रणाली कोद्रे

आयपीएल 2024

भारतात सध्या आयपीएल 2024 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने शानदार सुरुवात केली आहे.

Riyan Parag | Sakal

चौथा सामना

राजस्थान रॉयल्सने चौथा सामना जयपूरला 6 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध खेळला.

RR vs RCB | X/IPL

जनजागृती

या स्पर्धेदरम्यान राजस्थान रॉयल्स संघ राजस्थानमध्ये महिला सक्षमीकरणाबद्दल जनजागृती करतानाही दिसले आहेत. त्यांनी पूर्ण गुलाबी रंगाची जर्सीही याचसाठी घातली होती.

Rajasthan Royals | IPL 2024 | Sakal

राजस्थान रॉयल्सचा उपक्रम

दरम्यान, राजस्थानने अशीही घोषणा केली आहे की रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान मारण्यात येणाऱ्या प्रत्येक षटकारामागे राजस्थानमधील 6 घरात सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.

Sanju Samson | Sakal

राजस्थान रॉयल्स

हा उपक्रम राजस्थान रॉयल्स संघ आणि राजस्थान रॉयल्स फाउंडेशनतर्फे राबवण्यात येत आहे.

Rajasthan Royals | IPL 2024 | Sakal

कौतुक

राजस्थान रॉयल्स राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे.

Rajasthan Royals | IPL 2024 | Sakal

'T20 World Cup मध्ये खेळवा', युवीने कोणत्या डावखुऱ्या खेळाडूसाठी केली बॅटिंग?

Yuvraj Singh | X/BCCI