'T20 World Cup मध्ये खेळवा', युवीने कोणत्या डावखुऱ्या खेळाडूसाठी केली बॅटिंग?

प्रणाली कोद्रे

आयपीएल 2024

आयपीएल 2024 स्पर्धा सध्या सुरू असून या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू शिवम दुबे शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे.

Shivam Dube | IPL 2024 | Sakal

दुबेची आत्तापर्यंतची कामगिरी

डावखुरा खेळाडू दुबेने आत्तापर्यंत आयपीएल 2024 मध्ये खेळलेल्या चार सामन्यात 4 सामन्यात एका अर्धशतकासह 49.33 च्या सरासरीने आणि 160.87 च्या स्ट्राईक रेटने 148 धावा केल्या आहेत.

Shivam Dube | IPL 2024 | Sakal

दुबेची खेळी

दुबेने 5 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही चेन्नईकडून खेळताना 24 चेंडूत 45 धावांची खेळी केली.

Shivam Dube | IPL 2024 | Sakal

युवराजकडून कौतुक

त्याच्या या खेळीनंतर भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याचे भरभरून कौतुक केले आहे.

Shivam Dube | IPL 2024 | Sakal

टी20 वर्ल्डकपसाठी व्हावी निवड

युवराजने असेही म्हटले की शिवम दुबेला जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठीही निवडले जावे.

Shivam Dube | IPL 2024 | Sakal

युवराजची पोस्ट

युवराजने ट्वीट केले की 'शिवम दुबेला पाहाताना मजा आली. तो खूप सहज सीमारेषेबाहेर चेंडू मारत होता. मला वाटते तो वर्ल्डकपसाठी संघात हवाच. त्याच्याकडे गेमचेंजर बनण्याचे कौशल्य आहे.'

Shivam Dube | IPL 2024 | Sakal

भारतीय संघाची निवड

दरम्यान, टी20 वर्ल्डकपसाठी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताचा संघ निवडला जाण्याची शक्यता आहे.

Shivam Dube | IPL 2024 | Sakal

...अन् धोनी घराघरात पोहोचला

MS Dhoni | X/BCCI