Yashwant Kshirsagar
राज्यातील प्रत्येक गावात देवदैवतांची मंदिरे असतात आणि वार्षिक यात्रोत्सव साजरे होतात. गावकऱ्यांना आपल्या ग्रामदैवताचा खूप अभिमान असतो. तसाच अभिमान दुरगावच्या ग्रामस्थांना दुर्योधन मंदिराचा आहे. त्यांचा ग्रामदैवत दुर्योधन आहे!
Duryodhana Temple Durgav
esakal
हे मंदिर १५व्या शतकातील असल्याचे इतिहासकार सांगतात. मंदिराच्या बांधकामाबद्दल अनेक लोककथा प्रचलित आहेत. गावकरी या मंदिराला आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानतात.
Duryodhana Temple Durgav
esakal
महाभारतातील कौरव-पांडव युद्धानंतर जखमी दुर्योधन पांडवांना शरण न जाता दंडकारण्यात निघून गेला, अशी लोककथा आहे. दंडकारण्य नगर जिल्ह्यापर्यंत पसरलेले आहे आणि दुरगाव याच पार्श्वभूमीवर उभे आहे.
Duryodhana Temple Durgav
esakal
कौरवांनी अज्ञातवासात पाठवल्यानंतर पांडव काही काळ दुरगावात राहिले, अशीही अख्यायिका सांगितली जाते. याची साक्ष आजही गावात आहे आणि ग्रामस्थांना याचा अभिमान आहे
Duryodhana Temple Durgav
esakal
दुरगावातील पांडव डोह अजूनही दुर्योधन मंदिराशी जोडलेला आहे. लोक दुर्योधनाबरोबर पांडव डोहाचीही पूजा करतात. हा डोह महाभारताच्या काळाची साक्ष देतो.
Duryodhana Temple Durgav
esakal
‘दुर्गाव’ ते ‘दुरगाव’ असे गावाचे नाव या दुर्योधन मंदिरामुळेच पडले, असे ग्रामस्थ मानतात. मंदिराने गावाला ओळख दिली आणि इतिहासात अमर केले.
Duryodhana Temple Durgav
esakal
दुर्योधन महादेवाचा मोठा भक्त होता. मंदिरात दोन पिंडी आहेत. यामुळे दुर्योधन आणि शिवशंकर यांचा विशेष संबंध दिसून येतो.
Duryodhana Temple Durgav
esakal
मंदिरातून एक भुयारी मार्ग अश्वत्थामाच्या मंदिरात जातो. रात्रीच्या वेळी दुर्योधन हा मार्ग वापरून अश्वत्थामाला भेटत असे, अशी लोककथा आहे.
Duryodhana Temple Durgav
esakal
दर तीन वर्षांनी ग्रामस्थ मोठा उत्सव साजरा करतात. अधिक महिन्यात आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होते. गावभर भक्तीचा माहौल निर्माण होतो.
Duryodhana Temple Durgav
esakal
दुर्योधनाला पाहून ढग पळून जातात आणि पाऊस कमी पडतो, अशी श्रद्धा आहे. पाऊस न पडल्यास दुर्योधनाला कोंडले जाते आणि नंतर पाऊस येतो!
Duryodhana Temple Durgav
esakal
अलीकडे राज्य सरकारने मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. आता विकासकामे सुरू झाली आहेत.
Duryodhana Temple Durgav
esakal
World's Most Expensive Metal
esakal