दसऱ्याला आपट्याच्या पानांना सोन्याचा दर्जा का?

Aarti Badade

दसऱ्याला आपट्याची पाने ‘सोनं’ का?

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देण्याची महाराष्ट्रातील जुनी परंपरा आहे. ही पाने ‘सोनं’ म्हणून वाटली जातात; पण या प्रथेचा संबंध एका प्राचीन कथेशी जोडला जातो.

Dussehra Apta leaves

|

sakal 

‘सोनं लुटण्याची’ प्रथा कशी सुरू झाली?

पौराणिक कथेनुसार, कौत्स नावाच्या शिष्याने गुरुदक्षिणेसाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या. दानशूर रघुराजाने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुबेराकडून सुवर्णमुद्रा मिळवल्या.

Dussehra Apta leaves

|

sakal 

आपट्याच्या झाडाखाली ठेवले सोनं

रघुराजाने कौत्साला आवश्यक तेवढे सोने दिल्यानंतर उरलेल्या सुवर्णमुद्रा आपट्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आल्या. लोकांनी ते सोने घेऊन जावे, अशी परंपरा त्यातून निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

Dussehra Apta leaves

|

sakal 

आपट्याचं झाड इतकं खास का?

आपट्याची पाने दोन भागांत विभागलेली दिसतात, तर त्याची फुले पांढरी किंवा फिकट पिवळसर असतात. हे मध्यम आकाराचे झाड भारतातील कोरड्या आणि पर्णझडी जंगलांमध्ये आढळते.

Dussehra Apta leaves

|

sakal 

आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख

आपट्याला आयुर्वेदातही महत्त्व दिले गेले आहे. पारंपरिक औषधोपचारात त्याची साल, पाने आणि इतर भागांचा विविध कारणांसाठी वापर केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.

Dussehra Apta leaves

|

sakal 

आपट्याच्या झाडावर वाढतंय संकट

दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फांद्या तोडल्या जात असल्यामुळे आपट्याच्या नैसर्गिक पुनरुत्पादनावर परिणाम होत असल्याचे वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे परंपरेसोबत या झाडाच्या संवर्धनाचाही विचार करणे गरजेचे आहे.

Dussehra Apta leaves

|

sakal 

पाने तोडण्याऐवजी रोपं लावा!

आपट्याची पाने तोडून वाटण्याऐवजी दसऱ्याला आपट्याची रोपे देऊन त्यांची लागवड करण्याचा पर्याय पुढे आला आहे. ‘सोनं’ म्हणून पाने लुटण्यापेक्षा झाडांचे संवर्धन करून ही परंपरा पुढे नेणे अधिक पर्यावरणपूरक ठरू शकते.

Dussehra Apta leaves

|

sakal

घटस्थापनेत कलशावर नारळ का ठेवतात?

Ghatasthapana naral kalash

|

sakal

येथे क्लिक करा