Aarti Badade
हिंदू धर्मात नारळाला ‘श्रीफळ’ मानले जाते आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ अर्पण करून करण्याची परंपरा आहे.
Ghatasthapana naral kalash
नारळावरील तीन खुणांना भगवान शिवाच्या त्रिनेत्राशी जोडले जाते, त्यामुळे त्याला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिले जाते.
Ghatasthapana naral kalash
धार्मिक मान्यतेनुसार नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीकात्मक अस्तित्व मानले जाते, तर ‘श्री’ हे समृद्धीचे प्रतीक आहे.
Ghatasthapana naral kalash
कलशाला मानवी शरीराचे, नारळाच्या शेंड्यांना मस्तकाचे आणि त्यातील पांढऱ्या भाग व पाण्याला मनाच्या शुद्धतेचे प्रतीक मानले जाते.
Ghatasthapana naral kalash
नारळाचे कठीण कवच अहंकाराचे प्रतीक मानले जाते आणि कलशावर नारळ ठेवणे म्हणजे आपला अहंकार देवचरणी अर्पण करण्याचा आध्यात्मिक भाव असल्याचे मानले जाते.
Ghatasthapana naral kalash
कलशातील पाणी, पाने आणि त्यावरील नारळ यांची मांडणी सृजन, समृद्धी आणि पूजेच्या पूर्णत्वाचे प्रतीक मानली जाते.
Ghatasthapana naral kalash
परंपरागत मान्यतेनुसार कलशावर नारळ ठेवताना त्याचा शेंड्यांचा भाग पूजकाच्या दिशेने ठेवला जातो आणि यामुळे घरात सुख, समृद्धी व ऐश्वर्य नांदते, अशी श्रद्धा आहे.
Ghatasthapana naral kalash
salt spilling at home
Sakal