दसऱ्या दिवशी काय करावं आणि काय करू नये?

Monika Shinde

दसरा

यंदा दसरा २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो.

दिवस शुभ जातो

दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवपूजा करावी. मन शुद्ध राहिलं की दिवस शुभ जातो, असं मानलं जातं.

घर सजावट करा

घराच्या प्रवेशद्वारावर झेंडूची फुलं आणि दुर्वा यांची तोरणं लावावीत.

'सोनं' द्या

आपट्याची पानं ‘सोनं’ मानून शेजारी, मित्र आणि नातेवाईकांना द्यावीत. यामागे स्नेह, समृद्धी आणि एकोपा वाढवण्याचा हेतू असतो.

खोटं बोलणं टाळा

दसऱ्याच्या दिवशी कोणतीही फसवणूक, खोटं बोलणं किंवा चुकीचे व्यवहार करू नयेत.

शस्त्र व अवजारांची पूजा करा

या दिवशी आपण वापरत असलेली शस्त्र, अवजार, उपकरणं यांची पूजा केली जाते. कामाची साधनं पवित्र मानली जातात.

वाद घालू नका

कोणाशीही वाद घालू नका. राग, द्वेष किंवा सूडाच्या भावना मनातून काढून टाका. शांतता आणि सौहार्द वाढवणं गरजेचं आहे.

सुरेखा यादव कोण आहेत?

येथे क्लिक करा