Monika Shinde
सुरेखा यादव आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून ओळखल्या जातात.
त्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात २ सप्टेंबर १९६५ रोजी जन्मल्या. त्यांच्या आईचे नाव सोनाबाई भोसले आणि वडिलांचे नाव रामचंद्र भोसले आहे. त्या पाच भावंडांमधील सगळ्यात मोठी आहेत.
सुरेखाने सातारा जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केले. ९ सप्टेंबर १९८९ रोजी त्यांनी रेल्वे मध्ये लोकोपायलट म्हणून कारकीर्द सुरू केली.
पुरुष कर्मचाऱ्यांसोबत काम करत त्यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर विविध जबाबदाऱ्या स्वीकारून अनेक रेल्वे गाड्या चालवल्या.
सुरेखा यादव यांनी प्रथम मालगाडी चालवली. नंतर २००० मध्ये त्या ‘फर्स्ट लेडी ड्रायव्हर’ बनल्या. त्यांनी ‘मुंबई लोकल’, ‘डेक्कन क्वीन’, ‘वंदे भारत’ सारख्या प्रसिद्ध गाड्या चालवल्या. विशेष म्हणजे २०२३ मध्ये त्यांनी मुंबई- सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस चालवून एक नवा विक्रम केला.
३६ वर्षांच्या कारकीर्दीनंतर, सुरेखा यादव ३० सप्टेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत.
आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे आणि अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत