Shubham Banubakode
देशभरात आता E20 पेट्रोलचा वापर सुरू झाला आहे. मात्र, याच पेट्रोलमुळे अनेक वाहनचालक गाडी वारंवार बंद पडत असल्याची तक्रार करत आहेत.
E20 पेट्रोलमधील इथेनॉलमुळे इंजिन आणि गाडीतील काही महत्त्वाचे भाग हळूहळू खराब होण्याचा धोका वाढतो.
जुन्या बाईकमधील रबर पाईप, गास्केट आणि सील हे E20 मुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे गळतीसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
अशा वेळी फ्युएल अॅडिटीव्ह किंवा फ्युएल स्टॅबिलायझर वापरल्यास इंधन प्रणाली स्वच्छ राहण्यास मदत होते आणि संभाव्य नुकसानही कमी होऊ शकते.
कार्बोरेटर, इंजेक्टर आणि फ्यूल पाईपची वेळोवेळी स्वच्छता करत राहिल्यास इंजिनची कार्यक्षमता चांगली राहते.
जर गाडीचा वापर कमी होत असेल, तर टाकीत जास्त काळ पेट्रोल साठवून ठेवणे टाळा. त्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान टाळता येऊ शकते.
E20 पेट्रोलमुळे इंजिनवर थोडा अधिक ताण येऊ शकतो. त्यामुळे इंजिन ऑइल वेळेवर बदलणे फायद्याचे ठरते.
नियमित सर्व्हिसिंग, स्वच्छ इंधन प्रणाली आणि थोडीशी काळजी घेतल्यास जुनी बाईकही अनेक वर्षे उत्तम कामगिरी करू शकते.
Jamun Fruit Uses
esakal