१२५चे पेट्रोल ९५ पेक्षा कमी रुपयात; E20वर गडकरींची लोकसभेत माहिती, गाड्यांचे नुकसान नाही

सूरज यादव

ई२० इंधन

इथेनॉल ब्लेडिंगमुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयीतवरचं अवलंबित्व कमी झालं नसतं तर पेट्रोलच्या किंमती १२५ रुपये प्रती लीटर झाल्या असत्या असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

गडकरी

लोकसभेत एका लिखीत उत्तरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, जागतिक संकटात इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅमने ग्राहकांना झळ पोहोचण्यापासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय.

E20

पेट्रोल किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या पण सरकारने योग्य वेळी उचललेल्या पावलांमुळे आणि देशात इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली असल्याचंही गडकरींनी म्हटलंय.

E20

दिल्लीत दर

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलची किंमत १२५ रुपये प्रती लीटर झाली असती. पण भारतीय ग्राहकांना दिल्लीत ९४.७७ रुपये प्रती लीटर मोजावे लागतायत.

E20

ई२० धोरण

लोकसभेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्य मंत्री सुरेश गोपी यांनी लेखी उत्तरात म्हटलं की, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅमला नीती आयोग, गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, एआरएआय, सियाम, तेल कंपन्या आणि इतर संस्थांशी चर्चेनंतर लागू केलंय.

E20

६ वर्षांपासून ब्लेंडिंग इंधन

देशात ई१५ प्लस पेट्रोलचा वापर साडे तीन वर्षांहून अधिक काळ आणि ई२० पेट्रोल अडीच वर्षांपासून होत आहे.

E20

इंजिन खराब होत नाही

२० कोटी पेक्षा जास्त दुचाकी आणि ३ कोटींहून अधिक पेट्रोल कार या ब्लेंडिंग इंधनावर चालतायत. पण ब्लेंडिंग इंधनाने इंजिन खराब झाल्याचे पुरावे नाहीत असंही सरकारने म्हटलंय.

E20

पुरावे नाहीत

वाहन उत्पादक कंपन्यांच्या आकडेवारीनुसार ई२० इंधनामुळे इंजिन खराब झाल्याचं, ते गंजल्याचं समोर आलं नाहीय असे मंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं.

E20

दिवसापेक्षा रात्री ट्रेनचा वेग जास्त का असतो?

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

इथं क्लिक करा