संतोष कानडे
E85 इंधनामध्ये 85 टक्क्यांपर्यंत पेट्रोल आणि 15 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पेट्रोल असणार आहे. त्यामुळे इथेनॉलची मागणी वाढणार आहे.
इथेनॉल निर्मितीचे रॉ मटेरियल अर्थातच शेतीतून मिळणार आहे. ऊस, मका, ज्वारी आणि इतर धान्यांना इथेनॉलची निर्मिती होते.
यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना अधिक चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांनाही इथेनॉल उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
पिकांचे उत्पादन जास्त झाल्यास त्याचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करता येऊ शकतो. कृषी अवशेष, पाचट आणि इतर जैविक पदार्थांनाही आर्थिक मूल्य प्राप्त होऊ शकते.
ग्रामीण भागात इथेनॉल प्रकल्प उभारल्यास रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात.
देशाची इंधन आयात कमी झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही होऊ शकतो.
मात्र इथेनॉलसाठी अति प्रमाणात काही पिकांवर अवलंबून राहिल्यास पाणी आणि जमीन वापराचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे E85 मुळे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीची संधी निर्माण होऊ शकते, पण त्यासाठी संतुलित कृषी धोरणही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.