संतोष कानडे
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते 'E85' इंधनाचे औपचारिक अनावरण करण्यात आलं.
E85 आणि CNG ही दोन्ही पेट्रोलला पर्याय म्हणून उदयास येत असलेली इंधनं आहेत.
CNG हे नैसर्गिक वायूपासून तयार होतं, तर E85 मध्ये 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असतं.
प्रति किलोमीटर खर्चाच्या बाबतीत CNG सध्या E85 पेक्षा अधिक स्वस्त ठरू शकतं.
मात्र CNG वाहनांसाठी वेगळी टाकी आणि पंपांची आवश्यकता असते. तसं E85 इंजिनला गरज नाही.
CNG वाहनांमध्ये सामान ठेवण्याची जागा कमी होण्याची शक्यता असते, तर E85 वाहनांमध्ये ही समस्या नसते.
पर्यावरणाच्या दृष्टीने दोन्ही इंधनं पेट्रोलपेक्षा कमी प्रदूषण करणारी मानली जातात.
भारतामध्ये सध्या CNG पंपांचे जाळे अधिक विकसित आहे, तर E85 अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
सध्या खर्चासाठी CNG अधिक फायदेशीर वाटत असले, तरी भविष्यात उपलब्धता, किंमत आणि तंत्रज्ञानानुसार E85 देखील महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.