लांडगे रात्री चंद्राकडे पाहून का ओरडतात?

संतोष कानडे

लांडगा

लांडग्यांचा आवाज म्हणजे त्यांच्यासाठी संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं साधन असतं.

स्थानाची माहिती

लांडगे आपल्या कळपातील इतर सदस्यांना स्वतःच्या ठिकाणाची माहिती देण्यासाठी ओरडत असतात.

वातावरण शांत

रात्री वातावरण शांत असल्याने त्यांचा आवाज कितीतरी लांबपर्यंत पोहोचतो.

डोके

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी लांडगे अनेकदा डोके वर करून ओरडतात, त्यामुळे ते चंद्राकडे पाहत असल्याचं वाटतं.

लोकप्रिय समजूत

लांडगे चंद्राकडे पाहून ओरडतात, अशी लोकप्रिय समजूत आहे. मात्र विज्ञानानुसार ते प्रत्यक्षात चंद्राला पाहून ओरडत नाहीत.

प्रकाश

पूर्ण चंद्राच्या रात्री प्रकाश जास्त असल्यामुळे ते अधिक सक्रिय असू शकतात.

चंद्र

यामुळे लोकांना चंद्र आणि लांडग्यांच्या ओरडण्याचा संबंध असल्याचे वाटते.

संवाद

प्रत्यक्षात लांडगे चंद्राशी संवाद साधत नाहीत, तर आपल्या कळपाशी संपर्क साधत असतात.

मुघल बादशहांना कोणते गुप्त छंद होते?

<strong>येथे क्लिक करा</strong>