सकाळ डिजिटल टीम
रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध-हळद घेतल्यास आरोग्यास अनेक फायदे मिळतात.
झोपण्यापूर्वी एक कप दूध-हळद पिल्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन आणि दुधामधील ट्रिप्टोफॅन (tryptophan) हे घटक शांत झोपेसाठी मदत करतात.
हळदीतील कर्क्युमिनमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत मिळते.
हळदीचे दूध सांधेदुखी, स्नायूदुखी आणि इतर शारीरिक वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
हळदीतील गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर मानले जाते.
हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात आणि त्वचेला चमकदार बनवण्यास मदत कतरतात.
हळदीतील कर्क्युमिन अल्झायमर (Alzheimer's) सारख्या आजारांपासून संरक्षण करते आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते.
हळदीचे दूध पिण्यापूर्वी, ते कोमट करून प्यावे. जर तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असतील, तर हळदीचे दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.