किडनी निकामी होण्यापूर्वी शरीर देते ‘हे’ गंभीर संकेत; वेळीच ओळखा लक्षणे

Aarti Badade

किडनीचे महत्त्वाचे कार्य

किडनी आपल्या शरीरातील रक्तातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्याचे आणि रक्त शुद्ध करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करते.

Kidney failure symptoms

|

Sakal

शरीरावर सूज येणे

चेहरा, डोळ्यांच्या भोवती, पाय किंवा घोट्यांवर विनाकारण सूज येत असेल तर समजा किडनी शरीरातील जास्तीचे पाणी आणि मीठ बाहेर टाकू शकत नाहीये.

Kidney failure symptoms

|

Sakal

लघवीमध्ये होणारे बदल

रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला फेस येणे, रंग गडद होणे किंवा लघवीतून रक्त येणे हे किडनी फेल्युअरचे प्रमुख संकेत आहेत.

Kidney failure symptoms

|

Sakal

अचानक वाढलेला रक्तदाब

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम किडनी करते. जर तरुण वयात अचानक 'हाय ब्लड प्रेशर'चा त्रास सुरू झाला, तर ती किडनीच्या समस्येची सुरुवात असू शकते.

Kidney failure symptoms

|

Sakal

सततचा थकवा आणि अशक्तपणा

किडनी नीट काम करत नसेल तर रक्तातील विषारी घटक शरीरातच साचतात. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि सतत थकवा जाणवतो.

Kidney failure symptoms

|

Sakal

भूक मंदावणे आणि मळमळ

रक्तात टाकाऊ द्रव्ये साचल्यामुळे तोंडाची चव बदलणे (धातू सारखी चव), मळमळणे, उलट्या होणे आणि भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात.

Kidney failure symptoms

|

Sakal

कोणाला आहे सर्वाधिक धोका?

ज्यांना मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास आहे, अशा व्यक्तींनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे.

Kidney failure symptoms

|

Sakal

वेळीच डॉक्टरांची मदत घ्या

किडनीचे आजार सुरुवातीला कोणतीही मोठी लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे वरील बदल दिसल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Kidney failure symptoms

|

Sakal

औषधांशिवाय साखर कमी करायची आहे? फॉलो करा ‘हा’ सोपा डेली रुटीन

Blood sugar control tip

|

sakal

येथे क्लिक करा