औषधांशिवाय साखर कमी करायची आहे? फॉलो करा ‘हा’ सोपा डेली रुटीन

Aarti Badade

साखरेच्या पातळी

रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण केवळ ऊर्जेवरच नाही, तर मेंदू आणि शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावरही गंभीर परिणाम करू शकते.

Blood sugar control tip

|

Sakal

साखर वाढण्याची कारणे

चुकीचा आहार, अति गोड खाणे, व्यायामाचा अभाव, सततचा ताण आणि झोपेची कमतरता यामुळे साखरेची पातळी वेगाने वाढते.

Blood sugar control tip

|

Sakal

संतुलित आहाराचा अवलंब

जेवणात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तळलेले, प्रक्रिया केलेले (Processed) आणि गोड पदार्थ टाळणे केव्हाही फायदेशीर!

Blood sugar control tip

|

Sakal

नियमित शारीरिक हालचाल

रोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर ग्लुकोजचा योग्य वापर करते आणि साखर नियंत्रणात राहते.

Blood sugar control tip

|

Sakal

वाढते वजन वेळीच रोखा

लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका दुप्पट होतो. सक्रिय जीवनशैली आणि सकस आहार घेऊन वजन मर्यादित ठेवल्यास साखरेवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

Blood sugar control tip

|

Sakal

तणावाचे व्यवस्थापन

जास्त ताणामुळे शरीरातील हार्मोन्स बदलतात, ज्यामुळे साखर वाढते. हे टाळण्यासाठी दररोज मेडिटेशन, दीर्घ श्वास आणि पुरेशी विश्रांती घ्या.

Blood sugar control tip

|

Sakal

झोप

रोज ७ ते ८ तास शांत झोप घ्या. तसेच, रक्तातील साखरेची नियमित तपासणी करत राहा, जेणेकरून वेळेवर योग्य उपचार करणे सोपे होईल.

Blood sugar control tip

|

Sakal

रोजची डोकेदुखी नॉर्मल नाही! ‘या’ आजारांमुळे वाढू शकतो धोका!

Frequent headache reasons

|

Sakal

येथे क्लिक करा