Aarti Badade
मूत्रपिंड शरीरातील अपायकारक द्रव्ये बाहेर टाकतात, रक्त स्वच्छ करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
चुकीची जीवनशैली किडनीवर वाईट परिणाम करते. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता.
पाठदुखी,वारंवार लघवी होणे हे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
किडनी निकामी होऊ लागल्यास "ब्रेन फॉग" निर्माण होतो — विसरणे व एकाग्रतेचा अभाव.
पुरळ नसतानाही सतत खाज येणे, शरीरात कचरा साचल्यामुळे त्वचेला त्रास होतो.
हात, पाय, डोळ्यांभोवती सूज येणे म्हणजे मूत्रपिंड शरीरातील मीठ व पाणी बाहेर टाकू शकत नाहीत.
चव कडवट, खारट, धातूप्रमाणे वाटणे, यामुळे भूक मंदावते व वजन कमी होते.
मूत्रपिंड एरिथ्रोपोएटिन तयार करत नाहीत, यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता आणि थकवा निर्माण होतो.
वरील कोणतेही लक्षण जाणवत असेल, तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणे हे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.