Aarti Badade
जेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो किंवा कमी होतो, तेव्हा 'ब्रेन स्ट्रोक' येतो; ही एक गंभीर मेडिकल इमर्जन्सी आहे.
Brain Stroke Symptoms
Sakal
तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या झोपेत मेंदूत होणारे बदल सकाळी उठल्यावर स्पष्टपणे जाणवू शकतात, ज्याकडे आपण सामान्य थकवा समजून दुर्लक्ष करतो.
Brain Stroke Symptoms
Sakal
सकाळी उठून आरशात पाहताना चेहऱ्याची एक बाजू सैल किंवा वाकडी वाटत असेल किंवा हसताना चेहरा असमान दिसत असेल, तर हे मोठे संकेत आहेत.
Brain Stroke Symptoms
Sakal
अचानक शरीराच्या एका बाजूचा हात किंवा पाय सुन्न होणे किंवा त्यात अशक्तपणा जाणवणे हे मेंदूतील रक्ताची गुठळी किंवा रक्तस्त्रावाचे लक्षण असू शकते.
Brain Stroke Symptoms
Sakal
जर तुम्हाला साधे वाक्य बोलताना जीभ जड पडत असेल किंवा इतरांचे बोलणे नीट समजत नसेल, तर त्वरित सावध व्हावे.
Brain Stroke Symptoms
Sakal
एका डोळ्याने अस्पष्ट दिसणे, दुहेरी दृष्टी येणे किंवा चालताना अचानक संतुलन बिघडून अडखळणे हे मेंदूवर झालेल्या परिणामाचे लक्षण आहे.
Brain Stroke Symptoms
Sakal
F-Face (चेहरा वाकडा), A-Arm (हात वर न होणे), S-Speech (अस्पष्ट बोलणे) आणि T-Time (वेळ न घालवता हॉस्पिटलला जाणे); ही चाचणी प्राण वाचवू शकते.
Brain Stroke Symptoms
Sakal
स्ट्रोकच्या बाबतीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो; लक्षणे दिसताच वेळ न घालवता रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे नेणे मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान टाळू शकते.
Brain Stroke Symptoms
Sakal
Face Yoga Tip
Sakal