30-40 वयोगटात वाढतोय 'कोलन कॅन्सर'चा धोका; 'हे' संकेत दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

तरुणांमध्ये कोलन कॅन्सरचे प्रमाण वाढले

चुकीची जीवनशैली आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये मोठ्या आतड्याचा (कोलन) कॅन्सर वेगाने वाढत आहे.

Colon Cancer symptoms

|

Sakal

रात्री अचानक घाम येणे

उन्हाळ्यात घाम येणे सामान्य असले, तरी रात्री झोपेत अचानक घाम येणे, सतत ताप राहणे किंवा वजन कमी होणे ही कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

Colon Cancer symptoms

|

Sakal

शौचातून रक्त येणे

शौचातून रक्त येणे हे कोलन कॅन्सरचे सर्वात गंभीर लक्षण आहे; मूळव्याध समजून याकडे दुर्लक्ष न करता वारंवार त्रास होत असल्यास तपासणी करणे आवश्यक आहे.

Colon Cancer symptoms

|

Sakal

पचनसंस्थेत सतत होणारे बदल

काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ बद्धकोष्ठता (Constipation) किंवा जुलाब होणे, तसेच शौचाची पट्टी पातळ होणे हे धोक्याचे संकेत आहेत.

Colon Cancer symptoms

|

Sakal

सततचा थकवा आणि अशक्तपणा

नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे किंवा सतत झोप येणे हे कोलन कॅन्सरमुळे असू शकते; कॅन्सरमुळे शरीरात रक्तस्राव होऊन हिमोग्लोबिन कमी होते.

Colon Cancer symptoms

|

Sakal

जंक फूड आणि पोटाचे विकार

बाहेरचे पदार्थ आणि जंक फूड पचायला जड असतात, ज्यामुळे पोटाच्या तक्रारी वाढतात आणि भविष्यात गंभीर आजार उद्भवू शकतात.

Colon Cancer symptoms

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला आणि खबरदारी

पोट साफ होण्याच्या सवयीत बदल जाणवल्यास किंवा सतत टॉयलेटला जाण्याची भावना होत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Colon Cancer symptoms

|

Sakal

भात खाल्ल्यावर लगेच डुलक्या का येतात? 'या'मागे आहे मोठं शास्त्रीय कारण!

feel sleepy after eating rice

|

Sakal

येथे क्लिक करा