अपेंडिक्सकडे दुर्लक्ष करू नका! ही 7 लक्षणे दिसताच व्हा सावध

Aarti Badade

अपेंडिक्स म्हणजे काय?

अपेंडिक्स हा पोटाच्या उजव्या बाजूला मोठ्या आतड्याला जोडलेला बोटाच्या आकाराचा एक लहान अवयव आहे. रोगप्रतिकारशक्तीसाठी तो महत्त्वाचा असला तरी, त्यात संसर्ग झाल्यास तो धोकादायक ठरू शकतो.

Appendix symptoms

|

Sakal

नाभीभोवतीच्या वेदनांकडे लक्ष द्या

अपेंडिक्सची सुरुवात सहसा नाभीच्या (बेंबीच्या) भोवती होणाऱ्या वेदनांनी होते. कालांतराने या वेदना पोटाच्या उजव्या बाजूला खाली सरकतात आणि तीव्र होतात.

Appendix symptoms

|

Sakal

'ही' गंभीर लक्षणे ओळखा

मळमळणे, उलट्या होणे, भूक पूर्णपणे मरणे आणि हलका ताप येणे ही अपेंडिक्सची प्राथमिक लक्षणे आहेत. खोकताना किंवा पोटाला स्पर्श केल्यास वेदना अधिक वाढतात.

Appendix symptoms

|

Sakal

अपेंडिक्स फुटण्याचा मोठा धोका

वेळेवर उपचार न मिळाल्यास अपेंडिक्समध्ये पू होऊन तो फुटू शकतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते कारण यामुळे संसर्ग संपूर्ण पोटात पसरतो, ज्याला 'सेप्सिस' म्हणतात.

Appendix symptoms

|

Sakal

निदान आणि चाचण्या

पोटदुखी अपेंडिक्समुळेच आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टर रक्ताची चाचणी, लघवीची चाचणी, सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात.

Appendix symptoms

|

Sakal

बचावासाठी आहारात करा बदल

अपेंडिक्सचा त्रास टाळण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थ, पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

Appendix symptoms

|

Sakal

शस्त्रक्रिया आणि काळजी

अपेंडिक्स गंभीर झाल्यास शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव मार्ग असतो. शस्त्रक्रियेनंतर किमान २-३ आठवडे पूर्ण आराम करावा आणि जड वस्तू उचलणे किंवा तिखट पदार्थ खाणे टाळावे.

Appendix symptoms

|

Sakal

नजर वाढवायची आहे? दुधात टाका 'हा' पदार्थ; डोळे होतील तीक्ष्ण!

Almond milk benefits

|

Sakal

येथे क्लिक करा