Aarti Badade
ड्रायफ्रूट्समध्ये बदाम हे सर्वात शक्तिशाली मानले जातात. आहार तज्ज्ञ जया गावंडे यांच्या मते, बदामाचे दूध पिणे हे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते.
Almond milk benefits
Sakal
ज्या लोकांना गाईचे किंवा म्हशीचे दूध पचत नाही त्यांच्यासाठी बदामाचे दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात गाईच्या दुधापेक्षा ७० ते ८०% कमी कॅलरीज असतात.
Almond milk benefits
Sakal
बदामाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन डी, ए आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. यामुळे हाडांची घनता वाढते आणि हाडे अधिक मजबूत होण्यास मदत होते.
Almond milk benefits
Sakal
यात कोलेस्ट्रॉल कमी असते. हे दूध शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते.
Almond milk benefits
sakal
हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
Almond milk benefits
Sakal
बदामाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक डोळ्यांचे तेज वाढवण्यास आणि त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात.
Almond milk benefits
Sakal
रात्रभर बदाम भिजत ठेवा, सकाळी त्यांची साले काढून मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून फिरवा. हे मिश्रण गाळून घेतल्यावर तुमचे फ्रेश बदामाचे दूध तयार होईल!
Almond milk benefits
Sakal
Moringa leaves benefits
Sakal