Shubham Banubakode
मानवी शरीरातील सुमारे 60% भाग पाण्याने बनलेला असतो. पाणी शरीराचे तापमान, रक्तप्रवाह आणि अवयवांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Early Signs of Dehydration
esakal
तुम्हाला तहान लागते तेव्हा शरीरात आधीच पाण्याची कमतरता सुरू झालेली असते. त्यामुळे दिवसभर नियमित पाणी पिणे आवश्यक आहे.
Early Signs of Dehydration
esakal
पूर्ण झोप झाल्यानंतरही थकवा वाटत असेल, तर ते डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते. शरीरात द्रव कमी झाल्यास रक्तप्रवाह कमी होतो.
Early Signs of Dehydration
esakal
हळूहळू वाढणारी हलकी डोकेदुखीही पाण्याच्या कमतरतेचे संकेत देऊ शकते. शरीरात पाणी कमी झाल्यास मेंदूवर ताण येतो.
Early Signs of Dehydration
esakal
चेहरा धुतल्यानंतर त्वचा ताणल्यासारखी वाटणे किंवा बारीक रेषा दिसणे हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते.
Early Signs of Dehydration
esakal
लघवीचा रंग हलका पिवळा असणे सामान्य आहे. पण गडद पिवळा किंवा तीव्र वास येणारी लघवी डिहायड्रेशनचा संकेत असू शकते.
Early Signs of Dehydration
esakal
पुरेसे पाणी न घेतल्यास बद्धकोष्ठता किंवा पचन मंदावणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Early Signs of Dehydration
esakal
तज्ज्ञांच्या मते प्रौढ व्यक्तींनी दररोज साधारण 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. मात्र वय, हवामान आणि शारीरिक हालचालींनुसार हे प्रमाण बदलू शकते.
Early Signs of Dehydration
esakal
वरील माहितीही सामन्यात माहितीवर आधारित आहे, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Early Signs of Dehydration
esakal
Which Blood Group Has Highest Heart Disease Risk
esakal