कंबरेत दिसतात किडनी निकामी होण्याची 'ही' लक्षणं!

Aarti Badade

किडनी - शरीराची गाळणी

किडनी आपल्या रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीरातील पाणी आणि क्षारांचे संतुलन राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते.

Back pain and kidney connection

|

Sakal

कंबरेच्या खालच्या भागात वेदना

बरगड्यांच्या खाली किंवा कंबरेभोवती होणाऱ्या सततच्या वेदना हे किडनीच्या आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते, ज्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरेल.

Back pain and kidney connection

|

Sakal

लघवीच्या रंगात आणि प्रमाणात बदल

पुरेसे पाणी पिऊनही लघवीचा रंग सतत गडद राहणे किंवा लघवीतून रक्त येणे हे किडनी निकामी होण्याचे गंभीर संकेत आहेत.

Back pain and kidney connection

|

Sakal

चेहरा आणि डोळ्यांखाली सूज

सकाळी उठल्यावर चेहरा किंवा डोळ्यांखाली सूज दिसत असेल, तर ते शरीरात पाणी साचल्यामुळे किडनीच्या बिघाडाचे लक्षण असू शकते.

Back pain and kidney connection

|

Sakal

सततचा थकवा आणि अशक्तपणा

रक्तातील विषारी पदार्थ बाहेर न पडल्यामुळे ऊर्जा कमी होते आणि जास्त काम न करताही शरीराला सतत थकवा जाणवू लागतो.

Back pain and kidney connection

|

Sakal

श्वास घेण्यास त्रास होणे

शरीरात अनावश्यक पाणी साचल्यामुळे फुफ्फुसांवर ताण येतो, परिणामी थोडे चालल्यावर किंवा बोलतानाही मोठ्या प्रमाणावर दम लागतो.

Back pain and kidney connection

|

Sakal

भूक न लागणे आणि मळमळणे

किडनी नीट काम करत नसल्यास अन्नावरची वासना उडते आणि वारंवार मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास सतावू शकतो.

Back pain and kidney connection

|

Sakal

वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

यापैकी पाच किंवा अधिक लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि मीठ कमी वापरून नियमित आरोग्य तपासणी करा.

Back pain and kidney connection

|

Sakal

लिव्हर खराब होण्यापूर्वी पाय देतात 'हे' 4 संकेत!

Liver problem symptoms in feet

|

sakal

येथे क्लिक करा