Aarti Badade
लिव्हर कॅन्सर हा अत्यंत धोकादायक आजार आहे, कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत.
Liver cancer symptoms
sakal
रक्त शुद्ध करणे, विषारी घटक बाहेर टाकणे आणि पचनक्रिया सुधारणे ही महत्त्वाची कामे लिव्हर (यकृत) पार पाडते.
Liver cancer symptoms
Sakal
लिव्हर उजव्या बाजूला असते; जर तिथे सतत जडपणा, वेदना किंवा खेचल्यासारखे वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Liver cancer symptoms
Sakal
कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता जर तुमचे वजन अचानक घटू लागले, तर ते कॅन्सरच्या ट्यूमरचे लक्षण असू शकते.
Liver cancer symptoms
Sakal
थोडेसे खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखे वाटणे किंवा खाण्याची इच्छा पूर्णपणे मरणे, हा लिव्हर खराब झाल्याचा मोठा संकेत आहे.
Liver cancer symptoms
Sakal
लिव्हरच्या बिघाडामुळे शरीरातील बिलीरुबिन वाढते, ज्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी पडू लागते. याला साधी कावीळ समजून सोडू नका.
Liver cancer symptoms
sakal
पुरेशी विश्रांती घेऊनही जर तुम्हाला सतत अशक्तपणा आणि सुस्ती जाणवत असेल, तर लिव्हरच्या कार्याची तपासणी करणे गरजेचे आहे.
Liver cancer symptoms
Sakal
बदलती जीवनशैली, मद्यपान आणि अयोग्य आहारामुळे सध्या तरुणांमध्येही लिव्हर कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे.
Liver cancer symptoms
Sakal
अनेकजण या लक्षणांना गॅस किंवा ॲसिडिटी समजून घरगुती उपाय करतात, जे भविष्यात जीवघेणे ठरू शकते.
Liver cancer symptoms
sakal
वरीलपैकी कोणतेही लक्षण सतत जाणवत असल्यास, विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक चाचण्या करून घ्या.
Liver cancer symptoms
Sakal
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal