यकृत खराब होण्याची सुरवातीची लक्षण कोणती?

Monika Shinde

यकृत (लिव्हर)

यकृत (लिव्हर) शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्याचे कार्य बिघडल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात.

यकृत खराब होण्याची लक्षणं

यकृताच्या सुरुवातीच्या विकारांची ओळख वेळेत होणे आवश्यक आहे. कारण उपचार लवकर सुरू केल्याने गंभीर परिणाम टाळता येऊ शकतो.

पायांना सूज येणे

लिव्हर नीट काम न केल्यास शरीरात पाणी साचू लागते, ज्यामुळे पायांमध्ये सूज येते. ही सूज टाचांपासून सुरू होऊन घोट्यांपर्यंत पोहोचते आणि बहुतेक वेदनारहित असते.

त्वचेचा रंग बदलणे

लिव्हर खराब झाल्यास बिलिरुबिन वाढून त्वचा पिवळी होते आणि खाज सुटू लागते. हे लक्षण लिव्हर विकाराची सुरुवात दर्शवते.

नखांच्या रंगात बदल

नखांचा रंग बदलणे (पांढरट, निस्तेज, पिवळसर) आणि नखांवर भेगा किंवा तुटणे हे लिव्हर कार्यात समस्या असल्याचे संकेत आहेत.

थकवा आणि कमजोरी

लिव्हर खराब झाल्यास शरीरातील विषारी पदार्थ वाढतात, ज्यामुळे थकवा आणि कमजोरी जाणवते.

भूक कमी होणे

भूक कमी होणे आणि अनावश्यक वजन घटणेही लिव्हर विकाराचे लक्षण असू शकते.

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

वरील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण लवकर निदान आणि उपचार गंभीर त्रास टाळू शकतो.

रोज अक्रोड खा अन् 'हे' 5 झटपट आरोग्यदायी फायदे मिळवा!

येथे क्लिक कर..