Anushka Tapshalkar
इकॉनॉमिक सर्व्हे 2025-26 नुसार भारतात डायबिटीज हा गंभीर आरोग्य समस्या बनतो आहे. 9 कोटींहून अधिक लोकांना डायबिटीज असून ही संख्या 2026 पर्यंत 10 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
तहान, वारंवार लघवी यांसारख्या लक्षणांपूर्वीच त्वचेवर काही बदल दिसू शकतात. रक्ताभिसरण, प्रतिकारशक्ती आणि साखरेच्या पातळीचा थेट परिणाम त्वचेवर होतो.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
पायांच्या पुढील बाजूस लहान तपकिरी किंवा लालसर डाग दिसू लागतात. वेदना नसल्या तरी हे डायबिटीजशी संबंधित रक्तवाहिन्यांच्या बदलांचं लक्षण असू शकतं.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
मान, काख, जांघांजवळ दिसणारे गडद, मखमलीसारखे डाग म्हणजे इन्सुलिन रेसिस्टन्सचं लक्षण असू शकतं. लठ्ठपणा आणि डायबिटीजमध्ये हे जास्त आढळतं.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
लहान जखम, काप किंवा फोड बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल, तर रक्ताभिसरण व मज्जासंस्थेवर डायबिटीजचा परिणाम होत असल्याचं संकेत असू शकतात.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
सतत अंगावर फोड, बुरशी, खाज, पांढरे डाग किंवा इन्फेक्शन होत असेल, तर वाढलेली साखर जंतूंना पोषक वातावरण देत असल्याचं लक्षण असू शकतं.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
जास्त साखर शरीरातील पाणी कमी करते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते, खाज येते आणि नैसर्गिक ओलावा कमी होतो. हे डायबिटीजचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
विटिलिगो (पांढरे डाग) किंवा पायांवर चमकदार पिवळसर-तपकिरी चट्टे (नेक्रोबायोसिस लिपॉइडिका) दिसल्यास तात्काळ तपासणी गरजेची आहे. ICMR नुसार त्वचेची तपासणी डायबिटीज मॅनेजमेंटचा भाग असावा.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal
Who Should Avoid Detox Water
sakal