Monika Shinde
हल्ली ब्रेन ट्युमर या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.
त्यामुळे तुम्ही ब्रेन ट्युमर सुरुवातीची लक्षणे नक्की जाणून घ्या.
सकाळी उठल्यावर तीव्र वेदना जाणवत असतील आणि सामान्य औषधांनीही आराम मिळत नसेल, तर हे ब्रेन ट्यूमरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
ब्रेन ट्युमरमुळे सकाळी उठल्यावर विनाकारण मळमळ, उलटी होणं आणि थकवा जाणवतो.
चालताना अचानक तोल जाणं, दिशाभूल होणं किंवा संतुलन राखण्यात अडचण येणं हे मेंदूच्या समतोल नियंत्रणावर होणाऱ्या परिणामाचं लक्षण असू शकतं.
शब्द अडखळणे, वाक्य पूर्ण बोलता न येणं किंवा शब्द विसरणं हे संवाद नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागावर ट्यूमरचा परिणाम दर्शवू शकतात
डोळ्यांपुढे अंधुक दिसणं, डबल व्हिजन, किंवा एका डोळ्यात अचानक दिसणं बंद होणं ही दृष्टीशी संबंधित मेंदूच्या भागावर ताण असल्याचे लक्षणं आहेत.
अचानक विसरणं, विचार करताना वेळ लागणे, किंवा लक्ष केंद्रित न होणे हे देखील मेंदूतील कार्यक्षमता कमी होण्याची चिन्हं असू शकतात.