सकाळ डिजिटल टीम
दम्याची लक्षणे हळूहळू समोर येतात आणि त्याकडे वेळेवर लक्ष दिले नाही, तर त्रास वाढू शकतो. खालील लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या..
जर सतत छातीत जडपणा जाणवत असेल किंवा श्वास घेताना अडचण निर्माण होत असेल, तर हे दम्याचे प्राथमिक संकेत असू शकतात.
वारंवार खोकल्याचा त्रास होत असेल, विशेषतः रात्री किंवा थंड हवामानात, तर ते दम्याचे लक्षण असू शकते.
घसा सतत खवखवत असल्यास आणि आराम मिळत नसेल, तर हे लक्षण दुर्लक्षित करू नका.
जर श्वास घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागत असेल किंवा खोल श्वास घ्यावा लागत असेल, तर हेही दमा असल्याचे संकेत आहेत.
दम्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे सतत थकवा आणि कमजोरी जाणवू शकते.
जर वर नमूद केलेली एकाहून अधिक लक्षणे तुम्हाला जाणवत असतील, तर त्वरित छातीचा तपास करून घ्या.
आणि जर दमा असल्याचे निदान झाले असेल, तर इनहेलर नेहमी सोबत ठेवा, कारण योग्य वेळी इनहेलरचा वापर जीव वाचवू शकतो.