झोपताना जाणवणाऱ्या ‘या’ त्रासांकडे करू नका दुर्लक्ष! हार्ट अटॅक असू शकतो

Aarti Badade

शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या

बिघडलेली लाईफस्टाईल, ताण आणि अपुरी झोप यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही महत्त्वाचे इशारे देते, जे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

Heart attack night symptoms

|

Sakal

छातीत अस्वस्थता आणि जडपणा

छातीत सतत दुखणे, जडपणा जाणवणे किंवा कोणीतरी छाती चिरडत आहे असा भास होणे, हे हार्ट अटॅकचे सर्वात प्रमुख लक्षण मानले जाते.

Heart attack night symptoms

|

Sakal

अचानक श्वास घेण्यास त्रास होणे

कोणतेही कष्टाचे काम न करता जर अचानक दम लागत असेल किंवा श्वास घेण्यास अडथळा येत असेल, तर हे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते.

Heart attack night symptoms

|

Sakal

विनाकारण येणारा थंड घाम

एसीमध्ये किंवा थंड वातावरणात असूनही जर अचानक अंगाला थंड घाम येत असेल, तर तो हृदयाच्या समस्येचा गंभीर इशारा असू शकतो.

Heart attack night symptoms

|

Sakal

असामान्य थकवा आणि अशक्तपणा

पुरेशी विश्रांती घेऊनही जर सतत थकवा जाणवत असेल आणि साध्या कामातही अशक्तपणा वाटत असेल, तर हे हृदयाकडून मिळणारे धोक्याचे चिन्ह असू शकते.

Heart attack night symptoms

|

Sakal

मळमळ आणि चक्कर येणे

अचानक चक्कर येणे, मळमळणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे यांसारखी लक्षणे रक्ताभिसरण विस्कळीत झाल्यामुळे दिसू शकतात.

Heart attack night symptoms

|

sakal

वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

वरीलपैकी कोणतीही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा. वेळेवर उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो.

Heart attack night symptoms

|

Sakal

मेंदू तल्लख ठेवण्यासाठी करा 'हे' 7 सोपे बदल!

Brain health tips

|

Sakal

येथे क्लिक करा