स्लिप डिस्कची सुरुवातीची लक्षणे कोणती?

Monika Shinde

स्लिप डिस्क म्हणजे काय?

मणक्यांमध्ये असलेल्या डिस्क्स जेव्हा त्यांच्या ठिकाणाहून सरकतात, तेव्हा त्या जवळच्या नसा दाबतात. यालाच "स्लिप डिस्क" किंवा "हरनिएटेड डिस्क" म्हणतात.

तीव्र पाठदुखी किंवा कंबरदुखी

सर्वप्रथम दिसणारं लक्षण म्हणजे पाठ किंवा कंबरेत तीव्र वेदना. विशेषतः उठताना किंवा वाकताना त्रास वाढतो.

हात किंवा पाय सुन्न होणे

स्लिप डिस्क मुळे नसा दाबल्या गेल्यास, संबंधित भागात झिणझिणी किंवा सुन्नपणा जाणवतो.

एकाच बाजूला वेदना जाणवणे

पाठीच्या एका बाजूला किंवा फक्त एका पायातच वेदना जाणवणं हे सामान्य लक्षण आहे.

स्नायूंमध्ये कमजोरी

स्लिप डिस्कमुळे प्रभावित भागात स्नायूंची ताकद कमी होते. काही वेळा वस्तू उचलणेही कठीण होते.

चालण्यात अडचण

पाय सुन्न होणे किंवा कमकुवतपणामुळे चालताना अस्थिर वाटू शकते.

वाकणे किंवा बसणे अवघड जाणे

वेळेच्या प्रत्येक क्षणाला हालचाल करताना त्रास जाणवतो विशेषतः वाकताना, बसताना किंवा उठताना.

वेदना झोपेतसुद्धा कमी न होणे

स्लिप डिस्कची वेदना आराम करत असतानाही राहत नाही. रात्री झोपेतही त्रास होतो.

ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

येथे क्लिक करा