Monika Shinde
पोट किंवा कुशीत गाठसारखे काहीतरी हलके वाटणे हे हर्नियाचे पहिलं लक्षण असू शकतं. उभं राहिल्यावर गाठ अधिक ठळक दिसते.
जड वस्तू उचलताना विशिष्ट ठिकाणी दुखणे जाणवणे हे हर्नियाचे सामान्य लक्षण आहे. विशेषतः पोट किंवा कमर भागात.
पोटात वारंवार गॅस होणे, अपचन जाणवणे आणि पोट फुगणे यासारखी लक्षणे हर्नियाशी संबंधित असू शकतात.
गाठ असलेल्या भागात सौम्य जळजळ, चुरचुर किंवा ताण जाणवतो. विशेषतः दिवसभर हालचाल केल्यावर.
रात्री झोपल्यावर गाठ लहान होणे किंवा गायब होणे हे हर्नियाचे संकेत असू शकतात. पण उभं राहिल्यावर परत दिसते.
खोकल्याच्या वेळी गाठ अधिक जाणवणे किंवा दुखणे हे लक्षण हर्नियाशी संबंधित असू शकते.
काही रुग्णांमध्ये मल किंवा मूत्र करताना वेदना होऊ शकतात. विशेषतः जर हर्निया मोठा असेल.
हर्निया असताना शरीरावर ताण येतो. यामुळे थकवा, बेचैनी, आणि हालचालींमध्ये अडथळा जाणवतो.