लहान मुलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 5 महत्त्वाची लक्षणं...

Monika Shinde

लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित समस्या

अलीकडच्या काळात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित समस्या वाढत आहेत. हार्ट अटॅक अत्यंत दुर्मिळ असला तरी सुरुवातीची चेतावणी देणारी लक्षणं ओळखणे फार गरजेचे आहे.

छातीत वेदना

मुलांच्या छातीत अचानक जडपणा येणे किंवा वेदना जाणवणे. या वेदना हात, मान किंवा पाठीपर्यंत जाण्याची शक्यता. सतत असे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

श्वास घेण्यास त्रास

मोठं मोठ्याने श्वास घेणे, खेळताना श्वास कमी पडणे, किंवा शांत बसतानाही श्वास घेण्यास अडचण. हे हृदय नीट कार्य करत नसल्याचे संकेत देतात.

कारण नसताना जास्त घाम येणे

थंडी किंवा आरामात असतानाही जास्त घाम येणे. विशेषतः रात्रीच्या वेळी अधिक घाम येत असल्यास हृदयावर ताण असल्याचे लक्षण मानले जाते.

जबडा, चेहरा किंवा मान दुखणे

जबडा, चेहरा किंवा मानेमध्ये असामान्य वेदना जाणवणे. हे दात किंवा कानाची समस्या नसून हृदयाशी संबंधित गंभीर लक्षण असू शकते.

सतत थकवा

दिवसभर थकवा जाणवणे, ऊर्जा नसल्यासारखे वाटणे. अगदी आराम केल्यानंतरही दमलेपणा जाणवणे, हृदय शरीराला पुरेसा रक्तपुरवठा करत नसल्याचे संकेत असू शकते.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत लक्ष दिल्यास गंभीर धोका टाळता येतो.

आयुष्य सुंदर आहे, पण 'या' 4 गोष्टी नवऱ्यापासून बायकोने लपवलेल्या पाहिजेत!

येथे क्लिक करा