पृथ्वीचं एकूण क्षेत्रफळ किती?

Shubham Banubakode

पृथ्वीचं क्षेत्रफळ किती?

पृथ्वीचं क्षेत्रफळ तब्बल ५१ कोटी चौरस किलोमीटर असून, त्यातील बहुतांश भाग पाण्याने व्यापलेला आहे.

earth total area

|

esakal

जमिनीचा भाग किती?

पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे १४.९ कोटी चौरस किलोमीटर भाग जमीन आहे. याच जमिनीवर जगातील सुमारे १९५ देश वसले आहेत.

earth total area

|

esakal

जगातील सर्वात मोठे देश

क्षेत्रफळाच्या बाबतीत रशिया जगातील सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो.

earth total area

|

esakal

भारत किती मोठा?

भारताचं एकूण क्षेत्रफळ सुमारे ३२ लाख ८७ हजार चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे.

earth total area

|

esakal

भारतापेक्षा मोठे कोणते देश?

भारतापेक्षा क्षेत्रफळात मोठे फक्त सहा देश आहेत. रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे देश भारतापेक्षा मोठे आहेत.

earth total area

|

esakal

भारताची लांबी आणि रुंदी

भारत उत्तर ते दक्षिण सुमारे ३,२१४ किलोमीटर, तर पूर्व ते पश्चिम जवळपास २,९३३ किलोमीटर पसरलेला आहे.

earth total area

|

esakal

भौगोलिक विविधता का?

हिमालयापासून समुद्रापर्यंत भारतात पर्वत, मैदाने, पठार आणि वाळवंट असे अनेक भौगोलिक भाग पाहायला मिळतात.

earth total area

|

esakal

क्षेत्रफळ कमी, लोकसंख्या जास्त

भारत क्षेत्रफळात सातव्या क्रमांकावर असला तरी लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीन सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.

earth total area

|

esakal

सुक्या अन् कडक लिंबातूनही निघेल भरपूर रस! ही सोपी ट्रिक नक्की ट्राय करा

Squeeze More Juice From Dry & Hard Lemons

|

esakal

हेही वाचा -