Shubham Banubakode
लिंबू कापून कितीही पिळलं तरी रस कमी निघतोय? मग कापण्याआधी ही छोटीशी ट्रिक एकदा नक्की करून पाहा.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
लिंबू कापण्याआधी तळहाताखाली ठेवा आणि हलका दाब देत सपाट जागेवर काही सेकंद पुढे-मागे रोल करा.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
लिंबाला रोल केल्यामुळे आतल्या गरावर हलका दाब पडतो. त्यामुळे लिंबू कापल्यानंतर त्यातून रस काढणं थोडं सोपं होतं.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
लिंबू रोल करताना खूप जोर लावायची गरज नाही. हलक्या हाताने काही सेकंद फिरवलं तरी पुरेसं आहे.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
रसदार लिंबासाठी खूप कडक फळ घेऊ नका. हाताने हलकं दाबल्यावर थोडं नरम वाटणारं लिंबू निवडा.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
लिंबू पिळताना बिया आणि गर पडण्याचा त्रास होत असेल, तर रस एका छोट्या गाळणीतून गाळून घ्या.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
लिंबाच्या एका टोकाला बारीक छिद्र करून ते दाबलं, तर कापल्याशिवायही गरजेपुरता रस बाहेर काढता येतो.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
लिंबाचा आकार, ताजेपणा आणि पिकलेपणा यावर त्यातून मिळणारा रस ठरतो. त्यामुळे कधी कधी ट्रिकपेक्षा लिंबूच कमी रसदार असतो.
Squeeze More Juice From Dry & Hard Lemons
esakal
FAN
esakal