सकाळ डिजिटल टीम
भूकंप सुरू होताच खाली वाका, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या आणि एका हाताने डोके व मान झाकून टेबल घट्ट पकडून ठेवा.
Earthquake Safety Guide
sakal
टेबल नसेल तर घरातील भिंतीच्या कोपऱ्यात बसा. खिडक्या, काच, झुंबर आणि जड फर्निचरपासून दूर राहा.
Earthquake Safety Guide
sakal
धक्के सुरू असताना इमारतीबाहेर पळण्याचा प्रयत्न करू नका. संशोधनानुसार बाहेर धावतानाच लोक जास्त जखमी होतात.
Earthquake Safety Guide
sakal
तुम्ही आधीच बाहेर असाल तर इमारती, विजेचे खांब, झाडे आणि जाहिरात फलकांपासून दूर मोकळ्या जागेत थांबा.
Earthquake Safety Guide
sakal
सुरक्षित ठिकाणी गाडी बाजूला घ्या. पूल, उड्डाणपूल आणि झाडांखाली गाडी थांबवू नका आणि धक्के थांबेपर्यंत गाडीतच राहा.
Earthquake Safety Guide
sakal
दरवाजामध्ये आसरा घेऊ नका, ते सुरक्षित नसते. तसेच भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर पूर्णपणे टाळा.
Earthquake Safety Guide
sakal
गॅस गळती किंवा विजेचे नुकसान तपासा. गॅसचा संशय असल्यास काडीपेटी वापरू नका. आफ्टरशॉक्सपासून सावध राहा.
Earthquake Safety Guide
sakal
सध्या नाशिकमध्ये ३.४ आणि ४.३ रिश्टर स्केलचे धक्के बसले आहेत. जमिनीत पाणी झिरपल्याने टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे हे धक्के बसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Earthquake Safety Guide
sakal
रोज सफरचंदाचा रस प्यायल्याने शरीरात काय घडते?
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal