संतोष कानडे
माणसाला जसं एक हृदय असतं तसं इतर काही जीवांना दोन किंवा दोनपेक्षा जास्त हृदयं असू शकतात.
गांडूळ हा जीव सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी लिबलिबीत आणि नकोसा वाटणारा हा जीव शेतकऱ्यांचा मित्र आहे.
गांडूळ या जीवाला तब्बल १० हृदयं असतात. दोन-दोन हृदयांच्या पाच जोड्या त्याच्या शरीरात असतात.
शरीराच्या सातव्या ते आठव्या खंडामध्ये ही हृदयं दोन्ही बाजूंना कार्यरत असतात.
प्रत्येक हृदयाचं काम रक्ताला पम्पिंग करणं असतं. हृदयात कप्पे असतात त्यामुळे रक्त उलट्या दिशेने वाहात नाही.
ही हृदयं काळ्या रंगाच्या स्नायवी नलिकांसारखी दिसतात. संपूर्ण शरीरभर रक्ताभिसरण करण्याचं काम हृदयं करत असतात.
विशेष म्हणजे गांडुळांमध्ये रक्तसंवहन पद्धती असते. यामुळे कायम रक्त हे वाहिन्यांमध्येच राहाते.
अतिशय नकोसा वाटणारा हा जीव शरीररचनेनुसार अत्यंत वेगळा आणि आश्चर्यकारक आहे.