संतोष कानडे
जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये असलेली ४२ किलोंची खंडा तलवार प्रसिद्ध आहे. भाविक या तलवारीचं पूजन करतात.
ही एक दुधारी सरळ तलवार आहे. खंडा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तलवारीचं वजन ४२ किलो इतकं आहे.
मराठा सरदार महिपतराव पानसे आणि रामराव पानसे यांनी ही तलवार सतराव्या शतकात खंडोबाला अर्पण केली होती, असा उल्लेख काही शिलालेखांमध्ये आहे.
जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये दसऱ्याला आणि इतर काही सणांच्या वेळी या तलवारीचं पूजन केलं जातं.
विशेष म्हणजे विजयादशमीच्या दिवशी हा खंडा उचलण्याची स्पर्धा होते. यात्रेच्या वेळीही खंडा तलवार उचलण्याची पराकाष्टा केली जाते.
काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या दाताने हा खंडा उचलला होता, त्याची खूपच चर्चा झाली होती.
खंडोबा हे महाराष्ट्रातील प्रमुख लोकप्रिय दैवत आहे. दसऱ्याला या देवस्थानात यात्रा भरते.
जेजुरीमध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी हमखास गर्दी असते. महाराष्ट्रातली अनेक घराण्यांचं हे कुलदैवत आहे.
ant
esakal