Pranali Kodre
घर हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आपलं घर छान आणि नीटनेटकं दिसावं यासाठी आपण प्रयत्नही करत असतो.
आपलं घर आलिशान दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स आहे, ज्या आपण फॉलो करू शकतो.
घराच्या भिंतींना उजळ आणि आकर्षक रंग दिल्यास घर असल्यासारखं दिसेल. घरात उजेड दिसेल.
भिंतींवर छान पेटिंग्स लावल्यानेही घराला चांगला लूक येतो, पण म्हणून भरपूर पेटिंग्स लावायला हव्यात असं नाही.
घरात जास्त वस्तू आणण्यापेक्षा आवश्यक वस्तू ठेवा, ज्यामुळे पसारा न होता जागा भरपूर राहिल.
घरात लावता येतील अशा झाडांचा वापर करू शकता. त्यामुळे घरात ताजेपणाही राहिल.
घराला लक्झरी लूक देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता.
फर्निचरची डिझाईन आणि रंगसंगती एकसंध ठेवा, ज्यामुळे घराला छान लूक मिळू शकतो.
मोठ्या आणि सुंदर आरश्यांमुळे घर प्रशस्त आणि आलिशान दिसण्यास मदत होते.
घरात भरपूर प्रकाश असेल, तर उत्तम. यासोबतच सुंदर चँडेलियर, वॉल लॅम्प्स आणि फ्लोर लॅम्प्सचाही वापर करू शकता, ज्यामुळे घराला लक्झरी लूक मिळेल.