पुजा बोनकिले
आइस्क्रिम खायला सर्वांना आवडते.
खासकरून उन्हाळ्यात आइस्क्रिन खाण्याची मज्जाच वेगळी असते.
तुम्ही घर देखील कोकोनट आइस्क्रिम तयार करू शकता.
नारळ, वेलची पावडर, व्हिपिंग क्रिम, साखर, कंडेंस्ड मिल्क, नारळ दूध
सर्वात आधी नारळ किसून घ्यावे. नंतरकंडेंस्ड मिल्क मिल्कमध्ये चांगले मिसळावे.
आता पॅन गरम करून नारळाचे मिश्रण आणि दूध घट्टहोईपर्यंत शिजवावे.
दूध घट्ट झाल्यानंतर साखर आणि वेलची पावडर टाका. त्यानंतर गॅस बंद करा. मग ५ मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा.
थंड झाल्यानंतर व्हिपिंग क्रिम टाका आणि चांगले फेटा. नंतर आइस्क्रिम पॉटमध्ये सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
एका तासानंतर टेस्टी कोकोनट आइस्क्रीम खाण्याचा आनंद घेऊ शकता.