पुजा बोनकिले
गुलाब जामून रबडी बनवण्यासाठी पांढरी ब्रेड बारिक चिरून चांगले हाताने बारिक करा.
नंतर दूध मिसळा आणि चांगले मिश्रण घट्ट मळून घ्यावे.
नंतर छोटे गोल गुलाब जामून तयार करा.
साखर, पाणी, वेलची पावडर, केसर घालून पाक तयार करा.
नंतर छोटे गोल गुलाब जामून तेलात तळून घ्यावे. नंतर तळलेले गुलाब जामून पाकात टाकावे.
नंतर एका पॅनमध्ये दूधला गरम करावे. नंतर त्यात ब्रेड क्रम, सुकामेवा, वेलची पावडर, केसर घालून चवदार रबडी तयार करावी.
गुलाब जामून रबडी सर्व्ह करायला तयार आहे.
घरातील सर्व सदस्य आवडीने खातील.