Aarti Badade
पिझ्झा खाण्याची इच्छा झालीय? ओव्हन नसला तरी काळजी करू नका! भारती किणी यांनी सांगितलेल्या या सोप्या पद्धतीने तुम्ही तव्यावरच टेस्टी चिकन पिझ्झा बनवू शकता.
Chicken Pizza Recipe
Sakal
पिझ्झा ब्रेड, १०० ग्रॅम बोनलेस चिकन, चीज क्यूब्स, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस.
Chicken Pizza Recipe
sakal
सुरुवातीला १०० ग्रॅम बोनलेस चिकनमध्ये थोडी हळद आणि मीठ घालून ते व्यवस्थित शिजवून घ्या. शिजवलेल्या चिकनचे बारीक तुकडे करून बाजूला ठेवा.
Chicken Pizza Recipe
Sakal
एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घ्या. त्यात टोमॅटो सॉस आणि चिली सॉस घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
Chicken Pizza Recipe
Sakal
पिझ्झा ब्रेड घ्या आणि त्याला तयार केलेले सॉसचे मिश्रण व्यवस्थित लावून घ्या. यावर आता कापलेल्या भाज्या आणि शिजवलेले चिकनचे तुकडे पसरवा.
Chicken Pizza Recipe
Sakal
पिझ्झावर वरून भरपूर चीज किसून घाला. आता गॅसवर तवा गरम करा आणि त्यावर हा पिझ्झा ठेवा. त्यावर जड वजनाचे भांडे पालथे ठेवा जेणेकरून चीज व्यवस्थित वितळेल.
Chicken Pizza Recipe
Sakal
फक्त ५ मिनिटे मंद आचेवर वाफू द्या. चीज पूर्णपणे वितळले की तुमचा घरगुती 'चिकन पिझ्झा' खाण्यासाठी तयार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण यावर ताव मारतील!
Chicken Pizza Recipe
Sakal
Prawns Biryani recipe
Sakal