सुट्टीत काहीतरी खास? मग घरच्यांसाठी ट्राय करा स्पेशल ‘कोळंबी दम बिर्याणी’!

Aarti Badade

अस्सल कोळी चव

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आषाढात नॉनव्हेजवर ताव मारण्यासाठी 'झटपट प्रान्स बिर्याणी' हा एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे.

Prawns Biryani recipe

|

Sakal

प्रान्स मॅरिनेशन

१०० ग्रॅम प्रान्स स्वच्छ धुवून त्यांना हळद, काश्मिरी तिखट आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवा, जेणेकरून मसाले आतपर्यंत मुरतील.

Prawns Biryani recipe

|

Sakal

बासमती तांदूळ शिजवून घ्या

पाण्यात खडे मसाले, मीठ आणि साजूक तूप टाकून बासमती तांदूळ ८०% शिजवून घ्या. त्यानंतर भात चाळणीवर काढून मोकळा करा.

Prawns Biryani recipe

|

Sakal

फोडणीची तयारी

कुकरमध्ये तेल गरम करून जिरे, उभा चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट लालसर होईपर्यंत परता. यात बिर्याणी मसाला आणि सर्व तिखट मसाले घाला.

Prawns Biryani recipe

|

Sakal

प्रान्स मसाला तयार करा

मसाल्यात टोमॅटो, कोथिंबीर आणि दही घालून तेल सुटेपर्यंत शिजवा. आता मॅरिनेट केलेले प्रान्स टाकून ३-४ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा.

Prawns Biryani recipe

|

Sakal

बिर्याणीचे थर लावा

प्रान्स मसाला तयार झाल्यावर त्यावर शिजवलेल्या भाताचा थर पसरा. वरून तळलेला कांदा (बिरीस्ता), कोथिंबीर आणि साजूक तूप सोडा.

Prawns Biryani recipe

|

sakal

केसर आणि दम देण्याची प्रक्रिया

केसर पाण्यात किंवा दुधात मिक्स करून शेवटी ते सगळीकडे ओता. कुकरचे झाकण लावून मंद आचेवर 10 मिनिटे बिर्याणीला छान दम द्या.

Prawns Biryani recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा!

तयार आहे तुमची लज्जतदार प्रान्स बिर्याणी! लिंबाच्या स्लाईस आणि तळलेल्या पापडासोबत या खमंग मेजवानीचा आनंद घ्या.

Prawns Biryani recipe

|

Sakal

वीकेंड स्पेशल! घरीच बनवा क्रीमी चिकन टिक्का मसाला

 Chicken Tikka Masala

|

sakal

येथे क्लिक करा