कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स, जाणून घ्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

कारल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारल्यामध्ये अनेक घटक असतात. कारल्याचे सेवन अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे.

कारले ही एक भाजी आहे जी योग्य प्रकारे तयार करणे खूप महत्वाचे आहे. कारले खायला खूप चविष्ट असले तरी ते नीट तयार केला नाही तर त्याची चव एकदम कडू होते.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे असा विचार करून घरातील मोठे लोक आजही कारल्याची कडू भाजी खातात. पण लहान मुले खाण्यास नकार देतात. यामुळे तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊन कारल्याचा कडूपणा कमी करू शकता.

मीठ लावून ठेवावे

कारल्याची भाजी बनवण्याआधी कारल्याला सुमारे ३० मिनिटे मीठ लावून ठेवावे. मिठात आढळणारे खनिज कारल्याचा कडू रस काढून टाकण्यास मदत करतात.

दही

कारल्याची भाजी बनवण्यासाठी एक तास आधी कारले दह्यात भिजवून ठेवावे. यामुळे कारल्यामधला कडवटपणा कमी होतो. नंतर भाजी तयार करू शकता.

बिया काढा

कारल्याच्या बियांमध्ये खूप कडूपणा असतो. यामुळे कारले कापताना त्याच्या बिया काढून टाका. बिया काढून टाकल्यानंतर त्याचा कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

कारले नीट सोलावे

कारल्याची भाजी तयार करण्यापूर्वी नीट सोलून घ्यावे. असे केल्याने त्याचा कडवटपणा कमी होईल. कारल्याच्या सालीमध्ये जास्तीत जास्त कडूपणा आढळतो.

त्याची जाड साले काढावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते उन्हात वाळवू शकता आणि भरलेले कारले बनवताना वापरू शकता.

तुम्ही कारले मिठाच्या पाण्यात भिजवूनही ठेवू शकता. असे करण्यापुर्वी कारले स्वच्छ धुवावे.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea