Aarti Badade
अळू ही सहज मिळणारी पण अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. ग्रामीण भागात पाणथळ जागांवर याची विपुलता असते.
Colocasia esculenta अळूची पाने मोठ्या बदामासारख्या दिसतात. ही हिरव्या किंवा काळसर देठाची असतात.
अळू, धोपा, पोथीची पाने, आळू…
विविध भागात अळूला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. नागपुर व वर्हाडात ‘पोथीची पाने’ हे नाव प्रसिद्ध आहे.
फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते,ॲनिमियावर उपयुक्त,पचनशक्ती वाढवते,कॅल्शियम, व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर,गरोदर महिलांसाठी फायदेशीर
अळू,तेर अळू,काळ अळू,सफेद अळू,शोभेचे रंगीत अळू काही अळूंना सुंदर पिवळी किंवा भगवी फुलेही येतात.
ऋषिपंचमीला सफेद अळूची भाजी,पोळ्याच्या दिवशी नैवेद्यासाठी अळूची पाने,धार्मिक कार्यात अळूला मानाचे स्थान आहे.
बेसन अळू भाजी,अळूवडी,अळूवळी या सगळ्या चविष्ट आणि पोषक पदार्थात अळूचे महत्व!
प्राचीन लोकज्ञानानुसार अळूचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.