पुजा बोनकिले
रात्री लवकर जेवल्याने पचनसंस्थेला पुरेसा वेळ मिळतो. ज्यामुळे अपचन, गॅस आणि पोटदुखीचा त्रास कमी होतो.
लवकर जेवणामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
रात्री लवकर जेवल्याने रात्री पचनाचा ताण कमी होतो. परिणामी गाढ आणि शांत झोप लागते.
रात्री हलके आणि लवकर जेवण हृदयावर कमी ताण येतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
लवकर जेवणामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. मधुमेहींसाठी हे फायदेशीर ठरते.
सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते. कारण रात्री पचनक्रिया पूर्ण होऊन शरीराला विश्रांती मिळते.
लवकर जेवणामुळे पोटातील आम्लता आणि जळजळीचा धोका कमी होतो.
रात्री लवकर जेवणामुळे शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो, ज्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
रात्री लवकर जेवण केल्यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते, ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते.